मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणांना आता सुरुवात झाली असून सिद्धार्थने केळवणाचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत...सिद्धार्थ आणि मितालीचे पहिले केळवण अभिनेत्री इशा केसकरच्या घरी करण्यात आले तर दुसरे केळवण सिद्धार्थच्या मुंबईतील मित्रांनी केले. सिद्धार्थ मुळचा पुण्याचा आहे. पण गेल्या काही वर्षांपासून तो शूटिंगमुळे मुंबईत राहात आहे. सुरुवातीला सिद्धार्थ त्याच्या काही मित्रांसोबत विलेपार्ले येथे एकत्र एकाच फ्लॅटमध्ये राहात होता. याच सगळ्या मित्रांनी मिळून त्यांचे केळवण केले....सिद्धार्थ आणि मितालीचे हे केळवणाचे फोटो पाहून त्यांचे फॅन्स खूश झाले आहेत. त्यांच्या लग्नाची ते आतुरतेने वाट पाहात असल्याचे ते कमेंटद्वारे सांगत आहेत. त्यांनी लग्नाची तारीख त्यांच्या चाहत्यांना सांगितली नसली तरी ते नव्या वर्षाच्या सुरुवातीला लग्न करतील अशी त्यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
#lokmatcnxfilmy #SiddharthChandekar #MitaliMayekar #Kelwan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber